Mahaurja PM Kusum Yojna Maharashtra सौर कृषि पंप घेण्यासाठी शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद, संकेतस्थळ ठप्प होत असल्याने शेतकरी वर्गात नाराजी व्यक्त होताना दिसत आहे.
Mahaurja PM Kusum Yojna Maharashtra |
महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणामार्फत कुसुम सोलार पंप नोंदणी 2023 - 'Mahaurja PM Kusum Yojna Maharashtra'
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी
महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणामार्फत कुसुम सोलार पंप नोंदणी अर्ज हे १७ मेपासून महाऊर्जा च्या संकेतस्थळावर भरण्यासाठी उपलब्ध केले आहे.
शेतीला दिवसा पाणी देण्यासाठी महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणामार्फत (महाऊर्जा) राबवण्यात येणाऱ्या ‘पंतप्रधान कुसुम’ योजनेतून सौर कृषीपंप घेण्यासाठी राज्यभरातून शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद येताना दिसत आहे. 'Mahaurja PM Kusum Yojna Maharashtra'
एकाच वेळी अनेक शेतकरी अर्ज करत असल्याने संकेतस्थळ ठप्प होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
त्या पार्श्वभूमीवर ‘महाऊर्जा’मार्फत संकेतस्थळाचा दररोज आढावा घेऊन जिल्हानिहाय कोटा वाढवून दिला जात आहे. त्यामुळे सौर कृषीपंपांच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांनी कोटा उपलब्ध झाल्यावर अर्ज करावा.
शेतकऱ्यांना मिळणारा लाभ Mahaurja PM Kusum Yojna Maharashtra
पीएम- कुसुम योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमीन क्षेत्रानुसार व इतर पात्रतेच्या अटीनुसार ३, ५ व ७.५ HP DC क्षमतेचे पारेषण विरहित सौर कृषिपंप आस्थापित करण्यात येतात.
अडीच एकरपर्यंत शेतीसाठी 3 HP, पाच एकर शेतजमिनीसाठी 5 HP व त्यापेक्षा जास्त शेतजमीनधारकाला 7.5 HP क्षमतेचे सौर कृषीपंप दिले जातात. त्यासाठी शेतकऱ्यांनी ‘महाऊर्जा’च्या संकेतस्थळावरूनच ऑनलाइन अर्ज करावा. Mahaurja PM Kusum Yojna Maharashtra
यासाठी महाऊर्जाच्या खालील संकेतस्थळावर भेट देऊन योजने अंतर्गत अर्ज सादर करता येईल.
https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Component-B
अर्ज कसा करावा यासाठी महाऊर्जाने आपल्या पोर्टल वर सर्व माहिती व विडियो उपलब्ध करून दिला आहे. तुम्ही www.mahaurja.com वर जाऊन पाहू शकता. 'Mahaurja PM Kusum Yojna Maharashtra'
ज्या शेतकऱ्यांना यूजरनेम आणि पासवर्ड येत नाही आहे त्यांनी महाऊर्जा च्या कार्यालयाला भेट देऊन आपला यूजरनेम आणि पासवर्ड जाणून घ्यावा आणि आपला फॉर्म भरून घ्यावा.
शेतकऱ्यांनी महाऊर्जाच्या संकेतस्थळावरून अर्ज करावा व इतर कुठल्याही बनावट / फसव्या संकेतस्थळाचा वापर करू नये..
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाइट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official वेबसाइट मानू नका. आणि खाली कमेन्ट मध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांक, किंवा मोबाइल क्रमांक या सारखी कोणतीही वैयक्तिक माहिती टाकू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबद्दल क्वेरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्याना भेट देण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद !